जत तालुक्याला एक अत्यंत वैभवशाली इतिहास लाभला आहे. रामायण-महाभारत काळापासून ते अगदी पेशवाईकाळा पर्यन्त जतचे संबंध आढळतात. असंख्य ऐतिहासिक बदल जतने पहिले आहेत; आणि जतमधील अनेक वस्तू आजही त्याची साक्ष देतात. थोरलीवेस, डफळे सरकारांचा वाडा, लोखंडी पूल, राममंदिर, बंकेश्वर मंदिर, यल्लम्मा मंदिर अश्या अनेक वास्तू पुरातन काळाच्या आठवणी देत आजही तश्याच उभ्या आहेत. त्यात अंबाबाईचे मंदिर जणू जतच मुकुटमणीच आहे. ह्य वास्तूना न भेट देता निघणे म्हणजे जतला न जाणेच.
जत संस्थानाचा त्या काळचा दरवाजा. थोरली वेस ही सुद्धा जतची ओळखच आहे. प्रौढांचे संध्याकाळी भेटण्याचे ठिकाण. कामावरून परत येताना वेशीवरच्या धक्क्यावर बसून गप्पा मारून सगळा शीण जायचा त्यांचा. मुलांना ही बाबा सापडण्याचे हे एक महत्वाचे ठिकाण. गावातील सगळ्यात मोट्ठी दहीहंडी इथंच असायची.
जत वाचालनाय: तालुक्यातील पहिले सार्वजनिक वाचनालय ही इथं जवळच.
डफळे सरकारांचे मंदिर अशी ह्या मंदिराची ओळख. पुजारीही राज्यांनी नेमलेले. दरवर्षी खूप उत्साहात आणि खूप मोठ्या प्रमाणात रामनवमी साजरी व्हायची. पुढे तिथे समर्थ व्याख्यानमाला सुरु झाल्या.
बाजूला राजवाडा, तिथं SRVM शाळेच्या ५ वी आणि ६ वी चे वर्ग भरायचे. आतमध्ये चिन्गी बादशहा चा छोटेखानी दर्गा, जो हिंदू मुस्लिम ऐक्या साठी ओळखला जातो.
असं सांगतात की जत हा पूर्वी रामायणातील दंडकारण्याचा भाग होता, तर जत हि महाभारतातील एकचक्रा नागरी होती आणि बंकेश्वराचा संबंध बकासुराशी आहे अशीही आख्यायिका आहे. कालांतराने हे नाव जयंती नगर होते असेही सांगितले जाते. जतमध्ये सहाव्या शतक पासूनचे संदर्भ आढळून येतात. ११ व्या आणि १२ व्या शतकातील काही शिलालेख उमराणी,कोलगिरी आदी मंदिरांमध्ये आढळतात. राजा बिज्जलदेव (११ वे शतक कलचूरी घराणे) यांनी येथील मंदिरांना देणगी दिल्याचे उल्लेख सापडतात. पुढे हा प्रदेश विजापूरच्या आदिलशहाच्या अंमलाखाली आला. आणि इ स १६८१ मध्ये आदिलशहाने डफळे ह्या राजघराण्यातील पराक्रमी राजे सटवाजी यांना जतची जहागिरी दिली.
सटवाजी राजेंनी पुढे मोगलांविरुध्द च्या लढ्यात धनाजी संताजींना साथ दिली. पुढे पेशवाईच्या अस्तापर्यंत जत संस्थान पेशव्यांच्या अधिपत्याखाली होते. बाळाजी पेशवे यांनी १३ डीसें १७५५ मध्ये जततालुक्यातील उटगी येथे तर ०४ डीसें १७५५ मध्ये आसंगी येथे मुक्काम केल्याचे समजते. थोरल्या माधवराव पेशव्यांनीही जत तालुक्यात मुक्काम केल्याचे बखरीतून कळते. हैदर अली वर कर्नाटकात स्वारीवर जातानाच्या वास्तव्याचा आठवणी आहेत. डफळे संस्थानाची धुरा अमृतराव (दुसरे), राजेरामराव आणि त्यानंतर श्री विजयसिंहराजे यांनी सांभाळली. स्वातंत्र्यप्राप्ती नंतरही श्री विजयसिंहराजे यांनी खासदार रूपाने जतची सत्ता सांभाळली. ते काही काळ भारतीय नौदलातही होते.
Youth for Jath
Jeevan Rekha Blood Bank, Raje Ramrao College Road, Jath Pin 416 404 (MH) India
Copyright © 2023 Youth For Jath - All Rights Reserved.
Society Reg MAH/313/2016, Charity Reg F-17827
This website uses cookies. By continuing to use this site, you accept our use of cookies.